Pune : तलाठी अन् एका अल्पवयीन मुलीची कोकण कड्यावरून आत्महत्या? दोघांचा मृतदेह आढळल्यानं खळबळ
पुण्यात तलाठी आणि एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज असून याचे कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी १५ जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत होते, तेव्हाच या दोघांचे मृतदेह दरीत आढळले. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहे.
पुण्याच्या जुन्नरमध्ये तलाठी आणि मुलीचा मृतदेह दरीत आढळले आहेत. ही आत्महत्या असेल असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि जुन्नरच्या आंबोली येथील मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय, ती रामचंद्र यांची नात्यातील होती. हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते.
अशातच रामचंद्र पारधी यांची गाडी तीन-चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे, तसेच तिथंच पायातील चपला जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता. त्यानुसार कड्याच्या खोल दरीत शोध घेतला असता सुमारे बाराशे फुटावर मृतदेह आढळले. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या १६ जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले. यात मुलीचा मृतदेह बाराशे फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह तेराशे पन्नास फुटावर मिळून आला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

