Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार

पुण्याच्या प्रसिद्ध 'हुतात्मा बाबू गेणू मंडळ' च्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. एवढंच नाही तर, शेतकऱ्यांसाठी प्रार्थना आणि मदतीचे आवाहन केलं.

पुण्याच्या प्रसिद्ध ‘हुतात्मा बाबू गेणू मंडळ’ च्या यंदाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. यंदा या मंडळाने गुजरातधील प्रसिद्ध सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराची भव्य प्रतिकृती आणि शंकराची पिंड साकारली आहे. ज्यांना गुजरातला जाऊन प्रत्यक्ष सोमनाथ मंदिराचं दर्शन घेणं शक्य होत नाही, ते भाविक येथे येऊन बाप्पाचे आणि मंदिराचे दर्शन घेऊ शकतात.. असं मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर, शेतकऱ्यांसाठी प्रार्थना आणि मदतीचे आवाहन केलं. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी चिंतेत असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्व गणेश भक्तांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शक्य ती मदत करण्याचं आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. हे मंडळ विसर्जन किंवा इतर वेळी डॉल्बी किंवा कर्णकर्कश साऊंड सिस्टीमचा वापर करत नाही, तर पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात उत्सव साजरा केला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us