AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Mone : माझ्या लायकीबद्दल ज्यांनी लिहिलंं त्यांना…संजय मोने यांची पोस्ट चर्चेत, काय घडलं?

Sanjay Mone Post : संजय मोने यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

Sanjay Mone : माझ्या लायकीबद्दल ज्यांनी लिहिलंं त्यांना...संजय मोने यांची पोस्ट चर्चेत, काय घडलं?
| Updated on: Nov 06, 2026 | 5:27 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक संजय मोने सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या पर्वात अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमावर भाष्य करताना संजय मोने यांनी एक उपरोधिक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यांच्या मताचं समर्थन केलं, तर काही नेटकऱ्यांनी त्यांना लक्ष्य करत ट्रोल केलं. आता या टीकेला संजय मोने यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते संजय मोने?

‘कोण होणार करोडपती’मध्ये माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करताना दिसत आहे. हा कार्यक्रम पाहिल्यानंतर संजय मोने यांनी अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या संदर्भात एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी एका जुन्या मराठी म्हणीचा उल्लेख करत कार्यक्रमाच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, आपली टीका कलाकारांच्या अभिनयावर किंवा माधुरी यांच्या व्यक्तिमत्त्वावर नव्हती, तर कार्यक्रमाच्या सादरीकरणाबद्दल होती, असं त्यांनी स्पष्ट केलं. या पोस्टनंतर अनेकांनी संजय मोने यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही टिप्पणी केली. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या पत्नीचा उल्लेख करत त्या त्यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचं म्हटलं. यावर उत्तर देताना मोने म्हणाले की, त्यांची पत्नी आपल्यापेक्षा अधिक लोकप्रिय आणि गुणी आहे, हे त्यांनी तब्बल २७ वर्षांपूर्वीच मान्य केलं आहे. त्यामुळे अशा प्रतिक्रियांमुळे आपल्याला राग येण्याचं काहीच कारण नाही.

संजय मोने यांची पोस्ट

संजय मोने यांनी ट्रोलिंगवर उत्तर देत लिहिलं की, ‘परवा एक नोंद मी लिहिली, त्यात बच्चन साहेब आणि माधुरी बाई साहेब यांच्याबद्दल लिहिलं होतं. मला त्यात दोघांच्याहीबद्दल कलाकार म्हणून काहीही गैर लिहायचं नव्हतं. प्रश्न फक्त सादर करण्याबद्दल होता. माधुरी बाईच्या दिसण्यात काहीही उणीव काढताच येत नाही. त्या उत्तम अभिनेत्री आहेत, पडद्यावर सर्वोत्कृष्ट नृत्य सादर करतात, पण ज्या लोकांनी माझ्यावर भरघोस टीका केली, त्यात माझ्या एकंदर लायकीबद्दल असंख्य प्रश्न उपस्थित केले. त्याबद्दल मला फक्त हसायला आले. काही लोकांनी माझ्या मुलीबद्दल “तिला करायला सांगा हा कार्यक्रम “असाही प्रश्न उपस्थित केला माझ्या पत्नीबद्दल ही काहीबाही लिहिलं.’

‘माझी पत्नी माझ्याहून जास्त लोकप्रिय आहे असं ही लिहिलं, त्यामुळे मी चिडून काही प्रत्युत्तर करेन असंही त्यांना वाटलं. पण ती जास्त लोकप्रिय आहे आणि अधिक गुणी आहे हे मी २७ वर्षांपूर्वी मान्य केलं आहे आणि काही लोकांनी माझ्या मुलीला तिने कार्यक्रम करायला सांगा असा ही प्रश्न उपस्थित केला. त्याबद्दल उत्तर- माझी मुलगी आपल्या सगळ्यांच्या मनातही येणार नाही, अशा विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या ऑस्ट्रेलिया येथे नोकरी करत आहे. त्या आधी ती माननीय प्रकाशबाबा आमटे यांच्याकडे दीड महिना राहून आली आहे. जिथे no mall, no macdonald, no movie ही परिस्थिती होती.’

‘इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनही मराठी बोलताना तुम्ही ऐकणाऱ्या कुठल्याही कलाकारासारखं तिच्या वाक्याची सुरुवात so ह्या शब्दांनी होत नाही. तिला हवं ते अधिक शिक्षण घेऊन मायदेशी येण्याची तीव्र इच्छा आहे, पण तिच्या शिक्षणाचा उपयोग इथे आजतरी किंवा नजीकच्या भविष्यात नाही आणि माझ्या लायकीबद्दल ज्यांनी लिहिले आहे त्यांना एकदाच उत्तर देऊन त्यांची कीव करावी ही ही त्यांची “लायकी” नाही पण.. मी ४२ वर्षे या व्यवसायात आहे. ६० नाटकं, ४० चित्रपट आणि ३० मालिका, ९ चित्रपट लेखन, ७ नाटकांचं लेखन केलं आहे. १०० हजार स्तंभ लेखन केलं आहे. मला शिव्या देणाऱ्या लोकांना हेच सांगायचं आहे की समोरच्या माणसाने आपलं मत मांडल तर त्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार अगदीच मान्य आहे, पण तितकी तुमची लायकी असली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यातली एकही व्यक्ती मला तरी नामवंत वाटली नाही. आता राहिला शेवटचा प्रश्न “तुम्ही एकदा KBC सारखा कार्यक्रम करून दाखवा “तर मी मराठीत “कानाला खडा “नावाचा कार्यक्रम करून दाखवला आहे. शिवाय इतरही कार्यक्रमांचं सूत्र संचालन केलं आहे. या उप्पर आता हा विषय मी संपवला आहे, कारण ज्यांनी ज्यांनी लिहीलं आणि ते लिहितांना जितके शब्द वापरले तितक्या संख्येची पुस्तक मी वाचलेली आहेत.’ असं संजय मोने शेवटी म्हणाले.

Follow Us
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण