2 महिन्यात 2 मृत्यू! डंपरवाले कोणाच्या आशीर्वादाने घेताय पुणेकरांचा जीव?
पुण्यात बिल्डर-ठेकेदारांच्या बेदरकार डंपरमुळे अपघात वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत हिंजवडीत दोन महिलांचा बळी गेला, तर पिंपरी चिंचवडमध्ये ओव्हरलोड डंपर खचला. वाहतूक नियम कागदावरच असून, पोलीस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. यावर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
पुण्यात नेते आणि महापालिकेचा आशीर्वाद असल्याचा आरोप असलेले काही बिल्डर-ठेकेदारांचे डंपर पुणेकरांसाठी जीवघेणे ठरत आहेत. गेल्या दोन महिन्यांत हिंजवडी परिसरात अवजड वाहनांवर निर्बंध असतानाही डंपर बेदरकारपणे चालत आहेत. यामुळे दोन महिलांचा जीव गेला असून, पुण्याचे रस्ते आणि चेंबरही या ओव्हरलोड डंपरमुळे खचू लागले आहेत.
पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर येथे नुकतीच एक घटना घडली, जिथे एका ओव्हरलोड वाळूच्या डंपरचे चाक गटारीच्या चेंबरमध्ये जाऊन पूर्ण डंपर उलटला. सुदैवाने एका व्यक्तीने प्रसंगावधान राखत आपला जीव वाचवला. स्थानिक नागरिकांनी या चेंबरबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही तात्पुरती डागडुजी करून प्रश्न मिटवला गेला. हिंजवडीच्या पांडवनगरमध्ये एका ब्युटिशियन महिलेला भरधाव डंपरने चिरडले, ज्यात तिचा जागीच मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वीही हिंजवडीत डंपरच्या धडकेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या वाढत्या अपघातांनंतरही पोलीस, पालिका किंवा स्थानिक नेते या गंभीर समस्येकडे लक्ष देत नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

