Pune : पोलिसांकडून शिव्या मारला धक्का अन् थेट धमकी, यांना पोलीस म्हणायचं! घडलं तरी काय? VIDEO एकदा बघाच
पुण्यातील हिंजवडी मान परिसरातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पोलिसांना जाब विचारणाऱ्या नागरिकाला पोलिसांनीच शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे हिंजवडी मान परिसरातील रस्ते रुंदीकरणासाठी पोलीस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. याच संदर्भातला एक धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. कोणतीही नोटीस न देता बांधकामे पाडण्यासाठी का आलात ? असा जाब विचारणाऱ्या एका नागरिकाला हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस बालाजी पांढरे यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्के मारत अटक करण्याची धमकी दिल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय. याहून धक्कादायक म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या समोर हा प्रकार घडत असताना देखील ते पोलिसांच्या अशा दादागिरी समोर गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असल्याने हिंजवडी मान ग्रामस्थांमध्ये पोलिस आणि PMRDA प्रशासनात वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी

