Pune NCP : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा निषेध; पुण्याच्या बालगंधर्व चौकात भाजपाविरोधात मूक आंदोलन

पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याचा राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, शिवसेना या पक्षांतर्फे निषेध करण्यात येत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 18, 2022 | 10:40 AM

पुणे : भाजपा (BJP) कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुण्यात मूक निषेध आंदोलन (Agitation) करण्यात येत आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्यासमोर हे मूक आंदोलन करण्यात येत आहे. बालगंधर्व चौकात (Balgandharv Chowk) पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या दौऱ्यात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याचा राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, शिवसेना या पक्षांतर्फे निषेध करण्यात येत आहे. काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आक्रमक पवित्रा घेत कठोर शिक्षेची मागणी केली होती. हात उचलणाऱ्यांचे हात तोडू, असे त्या म्हणाल्या होत्या.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें