Pune : तो पत्नीला नगरसेवक बनवणार होता, पण तिनं त्याचाच केला घात, संशय अन् राग…पत्नीनं नवऱ्यालाच असं संपवलं
राजकीय महत्वकांक्षा आणि चारित्र्याच्या संशयावरून पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीने पतीची हत्या केली. नगरसेवक बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पतीला पत्नीने ओढणीने गळा आवळून संपवले. धक्कादायक म्हणजे, त्यावेळी त्यांची दोन लहान मुले बाजूच्या खोलीत झोपलेली होती. पोलिसांनी आरोपी पत्नी चैताली भोईरला अटक केली आहे, कौटुंबिक रागातून हे कृत्य घडल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे राजकीय महत्वकांक्षा आणि चारित्र्याच्या संशयामुळे एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. नकुल भोईर (वय ४०) हे समाजकार्यात सक्रिय होते आणि त्यांची पत्नी चैताली भोईर (वय २८) यांना नगरसेवक बनवण्याचे स्वप्न पाहत होते. नकुल भोईर संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शहीद भगतसिंग परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते, त्यांचा जनसंपर्क दांडगा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नकुल आपल्या पत्नी चैतालीवर वारंवार संशय घेत असे, ज्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत होती. चैताली महत्त्वाकांक्षी होती आणि तिला राजकारणात प्रवेश करायचा होता. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा एकदा चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, रागाच्या भरात चैतालीने पती नकुलच्या गळ्याभोवती ओढणीचा फास आवळून त्याची हत्या केली. ही घटना घडली तेव्हा त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुले आतल्या खोलीत झोपलेली होती. पोलिसांनी चैताली भोईरला अटक केली असून, कौटुंबिक रागातूनच हे कृत्य घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

