Ganesh Visarjan 2021 | पुण्यात मानाच्या गणपतीचं मंडपात विसर्जन होणार, शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव पार पडत आहे. पुणे पोलीस विसर्जन दिवसासाठीच्या बंदोबस्तासाठी तयार झाले आहेत. शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. शहरातील मानाच्या मंडळांच्या गणपतीचं विसर्जन हे मंडपातचं करण्यात येणार आहे.

पुणे शहरात सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव पार पडत आहे. पुणे पोलीस विसर्जन दिवसासाठीच्या बंदोबस्तासाठी तयार झाले आहेत. शहरात 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. शहरातील मानाच्या मंडळांच्या गणपतीचं विसर्जन हे मंडपातचं करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी पुणे पोलिसांचं पथक अ‌ॅलर्ट आहे. एखाद्या मंडळानं विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. विसर्जनाच्या दिवशी 7 हजार पोलिसांची फौज शहरात असेल. दंगल निंयत्रक पथक, शीघ्र कृती दल, सीसीटीव्ही याद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. मानाची मंडळं मंडपात विसर्जन सकाळी 10 वाजलेपासून सुरु करणार आहेत. कोणीही नियम मोडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. शहरातील वाढत्या गर्दीवरही लक्ष ठेवण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI