Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर कायम, धोका वाढला, भिडे पूल पुन्हा पाण्याखाली जाणार?
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. खडकवासला धरणातून १० हजार क्यूसेक विसर्ग सुरु असून, तो वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुठा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज येलो अलर्ट जारी केला आहे, ज्यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पुण्याच्या घाटमाथ्यावर रेड अलर्ट असून, तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. आज सकाळपासून शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून, घाटमाथ्यावर सध्या मुसळधार पाऊस पडत आहे.
घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण साखळी परिसरात मोठ्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची मोठी आवक होत आहे. पहाटे तीन वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल १० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण साखळी ९१% भरल्यामुळे हा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुठा नदीकाठावरील नागरिकांना आणि शहरातील सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

