Pune Velha Animal Death | चांदर गावात 30 जनावरांचा मृत्यू, तात्काळ पंचनामे करण्याची मागणी
मात्र ती रात्री उशिरा पर्यंत घरी नं परतल्यानं शेतकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला, तेंव्हा ही सर्व 14 जनावर मृत्यूमुखी पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यात दहा गाई, तीन बैल आणि एका म्हशीचा समावेशय.
पुण्यातल्या वेल्हा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं,दुर्गम भागातील खानू गावातल्या 14 जनावरांचा मृत्यू झालाय.त्यामुळं शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झालय.यामध्ये दहा गाई,तीन बैल आणि एका म्हशीचा समावेश आहे. मागच्या 8 दिवसांपासून वेल्हा तालुक्यात पावसानं थैमान घातलंय, मागच्या महिनाभरात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 1290 मिलीमीटर पावसाची नोंद वेल्हा तालुक्यात झालीयं तर दौंड तालुक्यात सर्वात कमी 157 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झालीय. मागील काही दिवसांपासून वेल्ह्यात धुवाधार पाऊस पडतोय. तालुक्यातील पानशेत खोऱ्यातल्या दुर्गम भागात असलेल्या खानू गावातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे चारा खाण्यासाठी,डोंगर परिसरात सोडली होती, मात्र ती रात्री उशिरा पर्यंत घरी नं परतल्यानं शेतकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला, तेंव्हा ही सर्व 14 जनावर मृत्यूमुखी पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यात दहा गाई, तीन बैल आणि एका म्हशीचा समावेशय.
Published on: Jul 30, 2022 10:48 AM
Latest Videos

