Raj Kundra प्रकरणी अधिवेशनात प्रश्न, पण तत्कालिन गृहमंत्र्यांकडून हास्यास्पद उत्तर : Ashish Shelar

केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. काही तरुण तरुणींची यात पिळवणूक होते का? नाईट लाईव्हच्या पुरस्कर्त्यांनी आता याकडे लक्ष द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले.

राज कुंद्राच्या या व्हिडिओबाबत आम्ही वारंवार प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले. हास्यास्पद उत्तर तत्कालिन गृहमंत्र्यांनी दिली. जणूकाय महाराष्ट्र सरकारचा याला राजाश्रय होता का असे दिसतेय. एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार चाईल्ड पोर्नग्राफीच्या क्लिप वायरल केल्या आहेत. २०१७ ते २०१९ कार्यकाळात ४५% पोक्सोचे गुन्हे दाखल झालेत. अनेक अश्लील अँपचे रँकेट आहे. जे एका ड्रग्ज तस्करांप्रमाणे कार्यरत आहे, असा दावा आशिष शेलार यांनी केला.

यामुळेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन हे प्रकरण निदर्शनास आणून दिलेलं आहे. राज कुंद्रांप्रमाणे अनेक जण यात गुंतलेलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून या प्रकरणाचा तपास होणं गरजेचं आहे. काही तरुण तरुणींची यात पिळवणूक होते का? नाईट लाईव्हच्या पुरस्कर्त्यांनी आता याकडे लक्ष द्यायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI