पक्षाने हकालपट्टी केल्याने शिवसैनिकांच्या डोळ्यात आश्रू!
सामना वृत्तपत्रातील बातमीनुसार राहता येथील निष्ठावान शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या हस्तक्षेपामुळे पक्षाला काँग्रेसमय केले जात असल्याचा आरोप या शिवसैनिकांनी केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत लक्ष घालण्याची आणि न्याय देण्याची विनंती केली आहे.
राहता नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामना वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार, निष्ठावान शिवसैनिक राजेंद्र सखाराम पठारे, माजी नगरसेवक सागर निवृत्ती लोटे आणि उमेदवार उज्वला राजेंद्र होले यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी राहता नगरपरिषद निवडणुकीत हस्तक्षेप केला. थोरात यांनी शिवसेनेला मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिला आणि पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते डावलून इतर उमेदवारांना पाठिंबा दिला. या उमेदवारांनी यापूर्वी विरोधी पक्षांशी संबंध ठेवले होते, असा आरोपही करण्यात आला आहे. पक्ष “कोल्हे आणि थोरात यांच्या इशाऱ्यावर चालणारी शिवसेना” बनत असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. हकालपट्टी झालेल्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या प्रकारात लक्ष घालून न्याय देण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

