महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर!

चेतन तुपेंकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. त्यानंतर झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले.

रचना भोंडवे

|

Jul 03, 2022 | 12:08 PM

मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षांचं (Maharashtra assembly Speaker) पद हे रिक्त आहे. नाना पटोले हे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी गेल्याने त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने अनेकदा हे पद भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वादामुळे आणि कायदेशीर पेचामुळे हे पद भरता आले नाही. आता बहुमताने आकडे फिरल्याने पुन्हा विधानसभा अध्यक्षांच्या निवड पार पडली. दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर हे निवडून आलेले आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विधानसभा (Vidhansabha Maharashtra) अध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपदासाटी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपेंकडून राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं कामकाज सुरू होताच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी पोल मागितला. त्यानंतर झिरवळ यांनी मतदान प्रक्रिया सुरू करण्यास प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर प्रत्येक सदस्यांजवळ जाऊन त्यांचे नाव नोंदवून घेतले गेले आणि मतदान प्रक्रिया पार पडली.राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना 164 मते मिळाली. तर साळवी यांना 107 एवढ्याच मतांवर समाधान व्यक्त करावं लागलं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें