Vikas Gogawale : रायगड तटकरेंच्या बापाचा नाही… गोगावलेंच्या मुलाने थेट बापच काढला, महायुतीत ठिणगी पेटणार?
रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेत राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी तटकरेंना आव्हान देत म्हटले आहे की, रायगड हा त्यांच्या बापाचा मक्तेदारीचा जिल्हा नाही. इथे कुणीही कुठेही जाऊ शकते आणि कुणी कुणाला अडवू शकत नाही.
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यात तीव्र राजकीय धुमश्चक्री सुरू असल्याचे चित्र आहे. या राजकीय वादात राज्याचे मंत्री असलेल्या भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी स्वतः उडी घेतली आहे. विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. “रायगड हा तटकरेंच्या बापाचा मक्तेदारीचा जिल्हा नाही,” असे रोखठोक वक्तव्य त्यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, “इथे कुणीही कुठेही जाऊ शकतं. कुणालाही कुणी अडवू शकत नाही.” रायगड जिल्हा हा सर्वसामान्य जनतेचा असून, तो कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कुटुंबाची मक्तेदारी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भरत गोगावले यांच्या मुलाने दिवाळीनंतर शिवसेना आमदारांचे दौरे रायगड जिल्ह्यात वाढणार असल्याचेही सूचित केले. फक्त तटकरेच जिल्ह्यात फिरू शकतात, असे नाही; तर रायगडमध्ये कुणीही कोणाला अडवू शकत नाही आणि सर्वांना फिरण्याचा अधिकार आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

