Video : राज ठाकरेंच्या सभेची सुरक्षा 5 डीसीपीच्या हाती

राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होतेय. या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जबाबदारी 5 डीसीपींवर सोपावण्यात आली आहे.  शिवतीर्थावर पाडव्यादिवशी घेतलेल्या सभेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले. त्याचे फटाके अजूनही राज्यभर फुटतायत. शिवाय आगामी महापालिका निवडणुका पाहता त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे चर्चेत राहणार आहेत. तोच राज […]

आयेशा सय्यद

|

Apr 28, 2022 | 3:06 PM

राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होतेय. या सभेसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. जबाबदारी 5 डीसीपींवर सोपावण्यात आली आहे.  शिवतीर्थावर पाडव्यादिवशी घेतलेल्या सभेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय वातावरण ढवळून काढले. त्याचे फटाके अजूनही राज्यभर फुटतायत. शिवाय आगामी महापालिका निवडणुका पाहता त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे चर्चेत राहणार आहेत. तोच राज ठाकरे यांनी एक मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) सभा घेणार असल्याची घोषणा केली. या सभेसाठी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्याचे समजते. औरंगाबादमधल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी लाखभर लोक सहज उपस्थित राहू शकतात. राज यांना ऐकण्यासाठी अख्खा मराठवाड्यातील लोक येथे येऊ शकतात. हे गृहीत धरून संपूर्ण शहरभर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. सभास्थळ मैदानावर दोन दरवाजातून प्रवेश दिला जाणार आहे. सभेसाठी रॅली, मिरवणुका काढण्यावर बंदी असणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें