AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : श्श्शूsss बोलू नका... राज ठाकरेंचा सतर्कतेचा संदेश की संभ्रम वाढवणारा आदेश? नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray : श्श्शूsss बोलू नका… राज ठाकरेंचा सतर्कतेचा संदेश की संभ्रम वाढवणारा आदेश? नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 10, 2025 | 5:55 PM
Share

मला विचारल्याशिवाय पक्षातल्या कोणीही आणि कोणत्याही विषयावर माध्यमांमध्ये बोलू नये असे आदेश राज ठाकरेंनी समर्थकांना दिलेत. हिंदी धोरणाविरोधातल्या मराठी मळाव्यानंतर आणि मीरा भाईंदर मधल्या मोर्चानंतर समर्थक आणि मराठी प्रेमींमध्ये उत्साह भरलाय. मात्र राज ठाकरेंच्या या आदेशान अनकांमध्ये काहीसा संभ्रमही तयार झालाय.

मीरा भाईंदरच्या काही हिंदी भाषिकांच्या मग्रुरीविरोधात मराठी लोकांनी पुकारलेल्या आंदोलनावेळी धरपकड झाली. पण पोलिसांना न जुमानता राजकीय कार्यकर्त्यांसह स्थानिकांच्या एकजुटीने आंदोलन यशस्वी केलं. यावर राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेची अपेक्षा असतानाच त्यांनी मात्र संध्याकाळीच आपल्या समर्थकांना काहीही न बोलण्याचं फर्मान सोडलं. राज ठाकरे यांनी ट्विटरवर असं म्हटलंय, एक स्पष्ट आदेश पक्षातिल कोणतीही वर्तमानपत्रे वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसेच स्वतःच्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा अजिबात टाकायचे नाहीत. माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा संवाद साधायचा नाही आणि सोशल मीडियावर देखील व्यक्त व्हायचं नाही. राज ठाकरे यांच्या या आदेशानं अनेक मनसैनिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाल्याचं बोललं जात आहे कारण बोलायचं नाही पण त्यामागचं कारण काय? हे राज ठाकरे यांनी सांगितलेलं नाही.

Published on: Jul 10, 2025 05:55 PM