AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | पालघर पोटनिवडणुकीत भाजप-मनसे एकत्र, पुणे-मुंबईत काय?

Special Report | पालघर पोटनिवडणुकीत भाजप-मनसे एकत्र, पुणे-मुंबईत काय?

| Edited By: | Updated on: Sep 28, 2021 | 12:26 AM
Share

राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये (Palghar) झाली आहे. पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे.

जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाडींबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. राज्यातील सर्वाधिक लक्ष लागलं आहे ते म्हणजे मनसे आणि भाजपची (MNS BJP) युती होणार की नाही याकडे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी महिन्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर, मनसे-भाजप युतीच्या चर्चांना जोर आला आहे. त्यातच आज पुण्यात (Pune) मनसे नेत्यांनी भाजपसोबत युतीची जाहीर मागणी केली आहे. असं असताना राज्यातील पहिली मनसे आणि भाजपची अखेर पालघरमध्ये (Palghar) झाली आहे. पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे.