अडचणीच्या काळात माझ्याजवळ अन् मतदानावेळी कुठे? राज ठाकरे यांनी कुणाला केला थेट सवाल?
VIDEO | अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र तुमची पिळवणूक करणाऱ्यांना तुम्ही मतदान का करता? राज ठाकरे यांचा थेट कुणाला सवाल?
नाशिक : नाशिकमधील शेतकऱ्यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. नाशिक जिल्हा बँक काही दिवसांपासून कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करत असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच आम्ही कर्ज भरण्यास तयार आहोत, मात्र काहीसा दिलासा मिळावा अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावर राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रतिप्रश्न करत, ‘तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र मतदान मला करत नाही’, असे खडे बोल देखील सुनावले. राज ठाकरे यांनी आश्वासन देत, लवकरच या विषयावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान यावेळी तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याजवळ येतात, मात्र तुमची पिळवणूक करणाऱ्यांना तुम्ही मतदान का करता? असा सवाल राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला. तर राज ठाकरे यांनी हा सवाल केल्यानंतर आम्ही सगळे आता तुमच्यासोबत आहोत, असे आश्वासन शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी दिलं आहे.
Published on: May 21, 2023 10:20 PM
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
