Raj Thackeray : बंदी घातली म्हणजे समजलं पाहिजे, शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैनमुनींना राज ठाकरेंनी सुनावलं
जैन लोकांनी आंदोलन केलं तेव्हा काही जणांनी चाकू सुऱ्या आणल्या असतील, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी. काल जे काही मराठी लोक गेली होती. त्यांना धक्काबुक्की झाली. पत्रकारालाही मारहाण झाली, हा नक्की काय प्रकार सुरु आहे? असा सवालही
मुंबईतील कबुतरखाना परिसरात कबुतरांना धान्य आणि दाणे देण्यास हायकोर्टाने परवानगी नाकारली आहे. तरी देखील काही नागरिकांकडून नियमांविरोधात कबुतरांना दाणे टाकले जात आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेल्या वादात जैन मुनींनी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली होती. जैन मुनींनी कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करून थेट शस्त्र उचलण्याची भाषा केली होती. आम्ही कोर्टाला मानणार नाही आणि शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलं आहे. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हायकोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे त्याप्रमाणे सर्वांना वागावं लागेल. त्याप्रमाणे जैन मुनींनी हा विचार करणं गरजेचे आहे. हायकोर्टाने जर कोणत्याही गोष्टीवर बंदी घातली आहे, तर त्याप्रकारे ती गोष्ट करायला हवं, असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

