दीड तासांपासून ठाकरे बंधूंची चर्चा सुरू! भेटीवर काय म्हणाले अंबादास दानवे?
राज ठाकरे कुटुंबीयांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम असला तरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ही कौटुंबिक भेट असल्याचे म्हटले, परंतु संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पूर्वीच दिलेल्या एकत्रित लढण्याच्या संकेतांकडेही लक्ष वेधले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबीयांसह उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही कौटुंबिक भेट स्नेहभोजनासाठी असल्याचे सांगण्यात आले. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल होताच माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी आई आहे बरोबर? असे म्हणत अधिक बोलणे टाळले.
या भेटीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हे दोन कुटुंब नसून एकच आहे आणि त्यांच्या भेटीत राजकीय अर्थ काढू नये. कुटुंब आणि राजकारण हे दोन स्वतंत्र विषय आहेत. मात्र, संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवतील असे संकेत दिले होते आणि उद्धव ठाकरे यांनीही एकत्र राहण्याची भूमिका स्पष्ट केली होती, याचा उल्लेख दानवे यांनी केला. ठाकरे ब्रँडची ताकद खूप मोठी असून म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भेटीची दखल घेतली जाते, असेही दानवे यांनी नमूद केले. महायुतीकडून होणाऱ्या टीकेला त्यांनी लोकशाहीतील सामान्य प्रक्रिया म्हटले, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास फरक पडणार नाही या दाव्याला काळच ठरवेल असे उत्तर दिले.
20 वर्ष नोकरी अन् 24 बदल्या...डॅशिंग तुकाराम मुंढे यांचं निलंबन होणार?
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता बाजूलाच, शिंदेंचे 22 आमदार फुटणार?
'शिवतीर्थ'वर तपोवनचा निर्धार? सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
वेगळ्या विदर्भासाठी काम सुरू, भाजपच्या बावनकुळे यांचं मोठं विधान

