भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर; म्हणाला, “ओबीसी नेत्यांना भाजप डावलतंय”
भाजपच्या एका ज्येष्ठ ओबीसी नेत्याने घरचा आहेर दिला आहे. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलं जात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकरे यांनी केल आहे. एकप्रकारे राजाभाऊ ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.
यवतमाळ : भाजपच्या एका ज्येष्ठ ओबीसी नेत्याने घरचा आहेर दिला आहे. भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना डावलं जात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकरे यांनी केल आहे. एकप्रकारे राजाभाऊ ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. “आज महाराष्ट्रात भाजपची जी प्रगती झाली ती मुख्यत: ओबीसी नेत्यांमुळे झाली आहे. आज ओबीसी नेत्यांमुळे भाजप महाराष्ट्रात तळागळापर्यंत पोहोचला.गोपीनाथ मुंडे, महादेवराव शिवणकर, भाऊसाहेब पुंडकर, अरुण अडसड, विदर्भातील माझ्यासह अनेक भाजप मधील जेष्ठ नेत्यांनी त्यावेळी जीवाचे रान करून भाजप महाराष्ट्रात वाढवला. ज्या ओबीसी नेत्यांनी भाजप वाढवला त्यांना डावलून दुसऱ्या पक्षातील ओबीसी नेत्यांना आणून भाजप काय साध्य करत आहे? आता आमची गरज भाजपला नाही का? तसेच आम्हeला महत्व दिले जात नाही, बोलवलं जात नाही,” अशी खंत राजाभाऊ ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!

