Satara | महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ उत्साहात पडला पार

राजमाता जिजाऊ साहेब यांचा ३६१ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथे दिमाखात पार पडला. 'छत्रपती वृषालीराजे भोसले' यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

महाराष्‍ट्रासह संपूर्ण देशाचे आराध्‍यदैवत, हिंदवी स्‍वराज्‍य संस्‍थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मातोश्री राजमाता जिजाऊ साहेब यांचा ३६१ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर येथे दिमाखात पार पडला. ‘छत्रपती वृषालीराजे भोसले’ यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. विविध रंगांच्या फुलांनी या सुवर्ण तुळ्याची सजावट करण्यात आली होती. मंदिराचा आजूबाजूचा परिसर देखील विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आला होता. खूप उत्साहाने आणि आनंदाने दरवर्षी ग्रामस्थ हा महोत्सव साजरा करतात.