Breaking | राजू नवघरेंचा घोड्यावर चढून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना व्हडिओ व्हायरल

वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला.

हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI