शेतकरी एनडीएविरोधात जात असल्याचा सर्व्हे येताच कृषी कायदे रद्द : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एक वर्ष भर कृषी कायद्याविरोधात संघर्ष केला. या काळात आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असं राजू शेट्टी म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांनी एक वर्ष भर कृषी कायद्याविरोधात संघर्ष केला. या काळात आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं तरी शेतकरी मागे हटले नाहीत. शेतकऱ्यांनी ऐतिहासिक एकजूट दाखवली. अजून ही महात्मा गांधींचे विचार तळागाळात पोहचले आहेत याच ज्वलंत उदाहरण आहे. काही लोक गांधींना बदनाम करत आहेत त्यांची खिल्ली उडवत आहेत त्यांना हे उत्तर आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर कायदा केला असला तरी लोकांना ते मान्य नसतील तर ते रद्द करावे लागतात हेच लोकशाहीच यश आहे. काही दिवसा नंतर चार राज्यात निवडणूक आहे. शेतकरी एनडीएच्या विरोधात जातात हे लक्षात आल्यावर हा निर्णय घेतलाय,तरीही मी याच स्वागत करतो, असं राजू शेट्टी म्हणाले. 26 जानेवारीला हा निर्णय झाला असता तर पंतप्रधानांचा सन्मान वाढला असता, असं राजू शेट्टी म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI