आंदोलन होऊनही मंत्री तोंड उघडायला तयार नाही, पायातलं हातात यायला वेळ लागणार नाही, राजू शेट्टी यांचा हल्लाबोल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलन सुरु होऊनही एकही मंत्री तोंड उघडायला तयार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलन सुरु होऊनही एकही मंत्री तोंड उघडायला तयार नाही. त्यामुळं सरकार किती संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांच्या भावनांची काय कदर यावरून कळत असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील विविध भागात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलन होऊन एक ही मंत्री तोंड उघडायला तयार नाही. नाक कस दाबायच हे आम्हालाही कळत असल्याचं राजू शेट्टी म्हणाले. आम्ही यांचा सात बारा मागत आहोत का? आम्ही फक्त वीज मागत आहोत. आमच्या जमीनी 15 ते 20 हजार एकरने जागा घेतल्या जरा तरी लाज वाटू द्या, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर पायातलं हातात यायला वेळ लागणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

