Video : देवेंद्र भुयारला स्वाभिमानीचा आमदार म्हणू नका, त्याची बुडावर लाथ मारुन हकालपट्टी केलीय- राजू शेट्टी
राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभव पक्तरावा लागलाय. भाजपचे धनंजय महाडिक मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या निकालामुळं भाजपच्या गोटात उत्साह तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात शांतता आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या पराभवाचं खापर शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी छोट्या पक्षाचे आणि काही अपक्ष आमदारांवर […]
राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) सहाव्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना पराभव पक्तरावा लागलाय. भाजपचे धनंजय महाडिक मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत. पहाटेच्या सुमारास लागलेल्या या निकालामुळं भाजपच्या गोटात उत्साह तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटात शांतता आणि नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या पराभवाचं खापर शिवसेनेचे आमदार संजय राऊत यांनी छोट्या पक्षाचे आणि काही अपक्ष आमदारांवर फोडलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी सहा आमदारांची नावंही घेतली. त्यात आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या नावाचाही समावेश आहे. भुयार यांचं नाव घेताना राऊतांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उल्लेख केला. त्यावर राजू शेट्टी चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी

