पुणे विद्यापीठात ‘त्या’ नाटकावरून नवा ड्रामा, ललित केंद्राच्या प्रमुखांसह 6 जणांना अटक अन्…
नाटकावरून सुरू झालेल्या वादानंतर सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात एका नाटकावरून राडा निर्माण झाला. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी जब वी मेट हे प्रायोगिक नाटक सादर केलं होतं. त्यामध्ये रामायणातील पात्रांमध्ये कलावंताचं खासगी आयुष्य दाखवलं गेलं
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील एका नाटकानं नवा वाद सुरू झाला. याप्रकरणी ललित केंद्राच्या प्रमुखांसह 6 जणांना अटक कऱण्यात आली आहे. मात्र त्यांना नंतर जामीनही देण्यात आला. नाटकावरून सुरू झालेल्या वादानंतर सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात एका नाटकावरून राडा निर्माण झाला. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी जब वी मेट हे प्रायोगिक नाटक सादर केलं होतं. त्यामध्ये रामायणातील पात्रांमध्ये कलावंताचं खासगी आयुष्य दाखवलं गेलं. त्यातील संवादाना अभाविपने आक्षेप घेतला आणि काल नाटक बंद पाडलं. यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंना कारवाईचं निवेदन दिलं. दुसरीकडे ललित कला अकादमीने कुलगुरूंना घेराव घातला आणि तुम्ही एकाबाजूनेच न्याय देत असल्याचा आरोप केला. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात नेमकं घडलं काय बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
Published on: Feb 04, 2024 11:42 AM
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
