“पोलिसांकडून राणा दाम्पत्याला वाईट वागणूक”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक (Navneet Rana Ravi Rana Arrest) करण्यात आली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिली गेली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अटक (Navneet Rana Ravi Rana Arrest) करण्यात आली. त्यानंतर त्यांना कस्टडीमध्ये हीन वागणूक दिली गेली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिला होता. त्यानंतर मोठा गदारोळ मुंबईत पाहायला मिळाला. खार येथील राणा यांच्या निवासस्थानी शनिवारी शिवसैनिकांनी हल्लाबोल केला होता. दुपारी राणांनी मातोश्रीवर (Matoshree) न जाण्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर संध्याकाळी राणा दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

