Raosaheb Danve | रावसाहेब दानवेंच्या 65 रु चेकचा किस्सा, मुख्यमंत्री खळखळून हसले

मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. नेहमीप्रमाणे दानवेंनी आपल्या भाषणात किस्से आणि जुन्या प्रसंगाची पेरणी केली. दानवेंनी सांगितलेल्या प्रसंगावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमोर यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तुफान फटकेबाजी केली. 41 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेचा सभापती असताना भत्तारुपी 65 रुपयांचा चेक कसा मिळाला याचा धमाल किस्सा रावसाहेब दानवे यांनी सांगितला. बँक अधिकाऱ्याने मला ओळखलं नाही. एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली, असं दानवे यांनी सांगितलं. दानवेंनी सांगितलेल्या प्रसंगावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
दानवेंच्या 65 रुपयांच्या चेकचा किस्सा

दानवे म्हणाले, ग्रामीण विकासाची पाया म्हणजे जिल्हा परिषद आहे. मी या जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी भाजप नव्हता, जनता पक्ष होता, आणि नांगराच्या चिन्हावर मी निवडून आलो होतो. मला तेव्हा 65 रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला… मला चेक देताना मॅनेजर चेक देईना… ते मला ओळखेना, कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं, असा धमाल किस्सा दानवेंनी आपल्या भाषणात सांगितला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI