Raosaheb Danve | रावसाहेब दानवे यांनी मारला मिरची भजीवर ताव, व्हिडीओ व्हायरल

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांची वागण्याची ग्रामीण शैली नेहमी आपल्याला बघायला मिळाली आहे. आज जालन्याहून परभणीकडे जात असताना रावसाहेब दानवे यांना मिर्ची भजी खाण्याचा मोह झाला आणि त्यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांची वागण्याची ग्रामीण शैली नेहमी आपल्याला बघायला मिळाली आहे. आज जालन्याहून परभणीकडे जात असताना रावसाहेब दानवे यांना मिर्ची भजी खाण्याचा मोह झाला आणि त्यांनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला.जालना परभणी रोडवरील विरेगाव येथे थांबत मिर्ची भज्यावर ताव मारला. केंद्रीय राज्यमंत्री सामान्य नागरिका प्रमाणे मिर्ची भजी खात असल्याने बघ्यांची मात्र गर्दी जमली होती. रावसाहेब दानवे यांचा भजी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल आहे. रावसाहेब दानवे यांच्या स्टाईलचे सोशल मीडियावर चाहते आहेत. रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी एका सभेत त्यांचा फाटलेला शर्ट दाखवला होता. रावसाहेब दानवे यांचा आजचा भजी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्याला पसंती देण्यात  आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI