महादेव जानकर यांचा पंकजा मुंडे यांना सल्ला की भाजपला टोला? केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘सासुरवास सहन करत’
आता मराठा समाजाच्या आरक्षणावरून आपण फेटा बांधणार नाही असा निर्धार केला आहे. त्यावरून आता त्या नाराज असल्याच्या तसेच भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीएसआर पक्षाची मोठी ऑफरही आहे.
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर त्यांनी आपल्या मनातील खदखद ही बोलून दाखवली आहे. तर आता मराठा समाजाच्या आरक्षणावरून आपण फेटा बांधणार नाही असा निर्धार केला आहे. त्यावरून आता त्या नाराज असल्याच्या तसेच भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तर त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या बीएसआर पक्षाची मोठी ऑफरही आहे. त्यामुळे त्या आता त्यांना योग्य पाटलं त्या पक्षात प्रवेश करतील असे बोलले जात आहे. याचदरम्यान पंकजा मुंडे यांचे मानसबंधू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांना मोठा सल्ला दिला आहे. तसेच एक मोठं विधान केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चांना उत आलं आहे. जानकर यांनी पंकजा मुंडे यांना सासुरवास सहन करण्याचा सल्ला देताना भाजपमध्येच रहावं असं म्हटलं आहे. तसेच त्या प्रगल्भ असून भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. ज्या पक्षात आहेत त्यांनी तिथेच सुखी राहावं, प्रसंगी सासुरवास सहन करावा. तर जेव्हा सासुरवास सहनच होत नाही असं वाटलं तर या भावाचा पक्ष आहेच. त्यांच्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे दरवाजे खुलीच आहेत असेही जानकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय खळबळ उडाली असून पंकजा मुंडे काय भूमिका घेणार? मानसबंधू जानकर यांचा हा सल्ला मानणार का? हे पहावं लागणार आहे.
Published on: Jul 02, 2023 08:04 AM
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
