Ganpatipule : गणपुतीपुळे जायचा प्लान करताय? बाप्पाच्या दर्शनाला जाताय? असे कपडे घालून जा नाहीतर NO Entry?
गणपतीपुळे मंदिरामध्ये ड्रेसकोड लागू होणार आहे. सध्या याबाबत भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मंदिराच्या परिसरात फलक लावण्यात आले आहेत. मंदिर प्रशासनाने या संदर्भात निर्णय घेतला असून, गणेशोत्सवापासून या नियमाची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे.
गणपतीपुळे येथील प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरात आता भाविकांना ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. मंदिर प्रशासनाने भारतीय संस्कृतीला साजेसे आणि सभ्य, अंगभर वस्त्र, पोशाख घालूनच दर्शनासाठी येण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच होणार असून, सध्या याबाबत भाविकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. या नियमानुसार, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तोकडे, स्लीव्हलेस किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले आहे.
हा नियम सक्तीचा नसून, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी केलेली एक विनंती असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतीपुणे मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यासंदर्भात नियमावली तयार केली जात होती मात्र आता एक फलक लाऊन त्यासंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील इतर अनेक मोठ्या मंदिरांमध्येही अशाच प्रकारचे नियम लागू करण्यात आले आहेत.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

