Pandharpur : विठुरायाच्या दरबारीही हिंदी सक्ती? 30-35 मराठी कुटुंब असताना विठ्ठलाची पूजा हिंदी भाषेत?
पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा केल्याचा आरोप नुकताच एका भाविकाने केला आहे. या आरोपांनंतर मंदिर समितीने तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. बघा नेमकं काय म्हटलं?
महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी-मराठी भाषा वाद हा एक जटिल आणि संवेदनशील विषय झाला आहे. हा वाद केवळ भाषेपुरता मर्यादित नसून, त्यात सामाजिक, सांस्कृतिक, आणि राजकीय पैलूदेखील समाविष्ट आहेत. अशातच विठुरायाच्या दरबारी देखील हिंदी सक्ती झालीये का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पंढरपूर येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात हिंदी भाषेतून पूजा केल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा होतोय. 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा सांगितली गेली. राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीने ट्विट करत हा दावा केला आहे. राहुल सातपुतेनं पंढरपूर मंदिर समितीकडे या प्रकरणी तक्रार केली. या तक्रारीनंतर चौकशी करून योग्य कारवाई करू आणि यापुढे मंदिरात मराठीतूनच पूजा होणार, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

