Pankaja Munde : जाते-जाते तुमने, आवाज तो दी होगी… वडिलांच्या आठवणीनं पंकजा मुंडेंच्या डोळ्यात पाणी, भर भाषणात भावूक
'मला बरेचजण सांगतात की माझी कार्यपद्धती ही गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी नाही. मी ते मान्य करते. कारण माझी काम करण्याची पद्धत ही माझ्या वडिलांना जशी हवी होती, तशीच आहे', असं पकंजा मुंडे लातूरमध्ये म्हणाल्या.
लातूर येथे माजी केंद्रीय मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले. लातूरमधील मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषण केले. आपल्या या भाषणात पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांबद्दल म्हणजेच गोपीनाथ मुंडे यांच्या बऱ्याच आठवणी सांगितल्या. त्यांच्याबद्दल भरभरून बोलतांना पंकजा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. हा पुतळा लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आला असून, शासकीय जागेत बसवण्यात आलेला हा मुंडेंचा राज्यातील पहिलाच पुतळा असल्याचे सांगितले जात आहे. या सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणासाठी लातूरसह आजूबाजूच्या परिसरातून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार

