Barsu Refinery : नितेश राणेंच्या दाव्याला ठाकरे गटाच्या आमदाराचं आव्हान, म्हणाले, …लोकचं
रिफायनरीच्या मुद्यावरून आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई : रत्नागिरीतील बारसू सोलगाव (Barsu Refinery) येथील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून राजकारण आणखी पेटणार आहे. रिफायनरीच्या मुद्यावरून (Ratnagiri Refinery)आता शिवसेना-शिंदे गट-भाजपने युती म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे. उद्धव यांच्या दौऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत रिफायनरीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. तर, याच दिवशी रिफायनरी समर्थक हे देखिल मोर्चा काढणार आहेत. यावेळी 25 ते 30 हजार रिफायनरी समर्थक मोर्चात सहभागी असतील तर नारायण राणे आणि उदय सामंत यावेळी मार्चात असतील असे असा दावा राणे यंनी केला आहे. नितेश राणे यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी पलटवार करताना राणे यांनी बारसू सोलगाव येथे जावं. त्यांना लोकचं मारून हाकलून देतील असा घणाघात केला आहे. त्यामुळे आजचा दिवस हा कोकणातील राजकीय तापमान हे वाढणारा ठरणार आहे.
Published on: May 06, 2023 08:39 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
