Ravindra Chavan : महाराष्ट्रात भाजपला मिळाला नवा कॅप्टन; प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती
BJP Maharashtra President Ravindra Chavan : रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झाली आहे.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजपची जबाबदारी कोण घेणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यानंतर आज रवींद्र चव्हाण यांच्या नावावर घोषणा झाली आहे. रवींद्र चव्हाण हे आधीच महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदावर होते. त्यामुळे या पदासाठी ते योग्य व्यक्ती आहेत यावर भाजपमध्ये एकमत होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांचे नाव दिल्लीला पाठवण्यात आले. या प्रक्रियेत इतर कोणत्याही नेत्याने अर्ज केला नाही, त्यामुळे आज रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
दरम्यान, रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर ते भाजपचे 12 वे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.