Mahayuti Alliance : जो कुछ है देवाभाऊ है… नंबर 2 ला किंमत नाही… महायुतीत बिघडलं? शिंदेंवर थेट निशाणा
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नंबर दोनला किंमत नसते असे विधान करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. यापूर्वी दोन तारखेपर्यंत युती टिकवायची या त्यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या होत्या. मंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार परिणय फुके यांनीही शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिले असून, भाजपमुळेच सरकार असल्याचे म्हटले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आणला आहे. चव्हाण यांनी जाहीरपणे “नंबर दोनला काहीच किंमत नसते. जो भी कुछ है, देवाभाऊ ही है,” असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस हेच नंबर वन असल्याचे सूचित केले आणि एकनाथ शिंदेंना त्यांच्या उपमुख्यमंत्रिपदाची जाणीव करून दिली. आर. आर. पाटलांच्या एका जुन्या भाषणाचा दाखला देत चव्हाण यांनी हे विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याआधीही रवींद्र चव्हाण यांनी दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे असे सूचक विधान करून राजकीय भुवया उंचावल्या होत्या. आता नंबर दोनला किंमत नाही असे त्यांचे थेट वक्तव्य महायुतीमधील कुरबुरी अधिक तीव्र करत आहे. हे केवळ रवींद्र चव्हाणांपुरते मर्यादित नाही. भाजपच्या इतर नेत्यांनीही शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान दिले आहे.
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन

