AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Army : पाकड्यांची मस्ती काय उतरेना... सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी, फोटो आला समोर

Pakistan Army : पाकड्यांची मस्ती काय उतरेना… सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी, फोटो आला समोर

| Updated on: Apr 26, 2025 | 3:52 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधी अनेक कठोर पाऊलं उचलली जात असताना पाकिस्तानचा थयथयाट अद्याप सुरूच असल्याचे दिसतंय भारताला सातत्याने धमक्या देण्याचं सत्र सुरू असतान आता पाकिस्तानी सैनिकांकडून LOC वर रेकी करण्यात आल्याची माहिती समोर येतेय.

पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) हल्ला केला होता. या हल्ल्यात २८ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात अनेक निर्णय घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. भारताने सिंधू जल करार स्थगित केला, अटारी-वाघा सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करून आणि पाकिस्तानी संरक्षण अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्यास सांगितले. असे असतानाही पाकिस्तानची मस्ती काही जिरली नसल्याचे दिसतंय. कारण पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांकडून LOC नियंत्रण रेषेवर रेकी केली जात आहे. LOC रेकी करत असताना पाकिस्तानी लष्कराचं सैन्य हे सामान्य वेशाष असल्याचे पाहायला मिळाले. तर पाकिस्तानी लष्कराच्या सैन्यातील काही जवानांनी पठाणी सूट देखील घातल्याचा एक फोटो समोर आला आहे. तर सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून LOC वर रेकी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Published on: Apr 26, 2025 03:52 PM