Rohini Khadse : पद जातंय या भीतीने..; ऑडिओ क्लिप शेअर करून रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका
Rohini Khadse criticized Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे.
पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे, असं रोहिणी खडसे यांनी म्हंटलं आहे. रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधात पोस्ट केल्याने कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे. महिलांना आता विरोध करण्याची सुद्धा मुभा राहिली नाही का? असा सवालही रोहिणी खडसे यांनी केला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या कारभारावर आता जोरदार टीका होत आहे. त्यातच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात रुपाली चाकणकरांची समर्थक महिला एका सामान्य महिलेला फोन करून धमकावत असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर करत चाकणकर यांच्यावर टीका केली आहे.
पोस्ट शेअर करत रोहिणी खडसे यांनी ही टीका केलेली आहे. या पोस्ट मध्ये रोहिणी खडसे यांनी म्हंटलं आहे की, आता पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत. महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही ?”, अशा शब्दांत रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

