AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!

रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्…अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक, त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!

| Updated on: Jun 28, 2026 | 3:45 PM
Share

28 जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात दिवंगत नेते अजित पवार यांचे निधन झाले होते. या घटनेला आता पाच महिने पूर्ण झाले आहेत. अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र शेअर केलं आहे. या पत्रातील काही ओळी सध्या विशेष चर्चेत आहेत.

रोहित पवार यांनी पत्रात लिहिलं आहे की, “तुमच्या लाडक्या रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं आणि त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं. खरं तर हा क्षण आनंदाचा होता, पण तुमची कमतरता प्रत्येकाला जाणवत होती.”

तसेच पुढे त्यांनी म्हटलं आहे, “रेवतीच्या लग्नात तुम्ही असायला हवे होतात. तिच्या आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या क्षणी तुमचा हात तिच्या डोक्यावर असायला हवा होता.”

पत्रात त्यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. “तुमचं मार्गदर्शन, तुमचं प्रेम आणि कार्यकर्त्यांबद्दलची आपुलकी आम्हाला कायम आठवत राहील,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

रोहित पवार यांनी शेअर केलेलं हे भावनिक पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

Published on: Jun 28, 2026 03:45 PM

Follow Us