Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळातच या आंदोलनाला सुरुवात होणार असून, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वेळातच या आंदोलनाला सुरुवात होणार असून, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समन्वयाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चार आमदार आणि एक खासदार असताना, या आंदोलनाबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याचे आमदार उत्तमराव जानकर आणि आमदार अभिजित पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत संवाद आणि समन्वयाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रोहित पवार यांनी मात्र आंदोलनावर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेले हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही. “अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकत नाही. सरकार लोकशाही मार्गाने आवाज उठवणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच, प्रशासनावर सरकारकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा करत, “अडथळे निर्माण केले जात असले तरी प्रशासनातील अनेक अधिकारी मनाने आमच्यासोबत आहेत,” असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, शेतकरी प्रश्न आणि पक्षांतर्गत समन्वय या दोन्ही मुद्द्यांवर चर्चा रंगू लागली आहे.
Published on: Jun 12, 2026 12:17 PM
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....

