आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धधोरणांमुळे अहिलानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडले असल्याचा दावा सुजय विखे पाटील यांनी केला आहे. युद्धांमुळे डांबर मिळत नसल्याने रस्त्याच्या कामाची किंमत अडीच पटीने वाढली असून, ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस पाहिला नसल्याचे विखे पाटील यांनी मिश्किलपणे म्हटले.
अहिलानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. यावर आता रोहित पवारांची प्रतिक्रियादेखील आली आहे. ट्रम्प यांच्या युद्धधोरणांमुळे अहिलानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडले असल्याचा दावा त्यांनी केला. “डांबर आता दिल्लीवरून आणावे लागत आहे,” असे मिश्किल वक्तव्यही त्यांनी केले. त्यांच्या मते, ट्रम्प यांच्या युद्धनीतीतील धरसोड वृत्तीमुळे डांबर मिळणे कठीण झाले आहे, ज्याचा थेट परिणाम रस्त्याच्या कामावर होत आहे.
यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देताना सांगितलं आहे की, “आता काय ट्र्म्प येऊन रस्त्यांचं काम करणार आहेत का? फोडून फोडून खापर तुम्ही कोणावर फोडलं. कमीत कमी तुमच्या सरकारवर तरी फोडायचं होतं. तर आम्हाला वाटलं तरी असतं की, काही बौद्धीक क्षमता आहे… काही समज आहे तुमच्यामध्ये…”
Published on: Aug 16, 2026 02:40 PM
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...

