VIDEO : ‘ससून’च्या शवागृहाबाहेर नातेवाईकांच्या रांगा, गाड्या मोजा, मृतांची भीषणता लक्षात येईल!

दिवसभर ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital Pune) शवागृहाबाहेर रुग्णवाहिका आणि मृतांच्या नातेवाईकांनी रांग लावली होती.

सचिन पाटील

|

Apr 12, 2021 | 6:55 PM

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाची (Pune Corona update) स्थिती किती गंभीर बनलीय याचं भयानक चित्र समोर आलं आहे. कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कोरोना रुग्णांसोबत कोरोना मृतांचा आकडाही वाढत आहे. आज दिवसभर ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital Pune) शवागृहाबाहेर रुग्णवाहिका आणि मृतांच्या नातेवाईकांनी रांग लावली होती. शहरात आतापर्यंत एकूण 5 हजारांच्यापेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. शिवाय पहाटेपासून दुपारपर्यंत ससूनच्या शवागृहात 30 डेडबॉडी ठेवण्यात आल्या होत्या. डेडबॉडी घेण्यासाठी ससूनला नातेवाईकांनी गर्दी केली होती.

VIDEO : ससून रुग्णालयाच्या शवागृहाबाहेर नातेवाईकांच्या रांगा

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें