शिवाजी महाराजांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
'शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी सर्व शोधून काढलं' तर तर रविंद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कविता लिहिली... असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलं.
‘शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी सर्व शोधून काढलं’, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केले. तर रविंद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कविता लिहिली असेही मोहन भागवत म्हणाले. शिवाजी महाराजांची प्रेरणा, शिवाजी महाराजांचं राज्य तेव्हा किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र आहे, तेवढंही नव्हतं…असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. आग्र्याहून शिवाजी महाराज परत आल्यानंतर हे निश्चित झालं की, आता शिवाजी महाराजांचं स्वराज्य टिकणार आणि सगळ्यांना उपाय सापडला, त्यामुळे सगळ्यांचे संघर्ष सुरू झाले इतकंच नाहीतर सगळे यशस्वी झाले, असेही मोहन भागवत यांनी सांगितले. तर इंग्रजांच्या विरूद्ध लढताना शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे शिवरायाचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सगळं शोधून काढलं, असं मोहन भागवत म्हणाले.