AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Phaltan Doctor Death : लक्ष्मीपूजनला डॉक्टर तरुणीचं त्या गोष्टीवरून बनकरशी वाजलं, आधी मंदिर गाठलं, नंतर लॉज... रात्रभर काय-काय घडलं?

Phaltan Doctor Death : लक्ष्मीपूजनला डॉक्टर तरुणीचं त्या गोष्टीवरून बनकरशी वाजलं, आधी मंदिर गाठलं, नंतर लॉज… रात्रभर काय-काय घडलं?

| Updated on: Oct 27, 2025 | 3:20 PM
Share

सातारा येथील डॉक्टर प्रकरणासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे चाकणकर यांनी राज्यातील कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता देण्यासाठी सक्रिय ICCs चे महत्त्व अधोरेखित केले.

सातारा डॉक्टर प्रकरण अत्यंत दुर्दैवी असून, रुपाली चाकणकर यांनी या घटनेवर सविस्तर माहिती दिली आहे. यात POSH कायद्यातील सुधारणा, सक्रिय अंतर्गत तक्रार समित्यांची (ICCs) आवश्यकता आणि पोलीस व डॉक्टर यांच्यातील तक्रारींवर झालेल्या चौकशीचा समावेश आहे. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, राज्य महिला आयोग लक्ष ठेवून आहे.

राज्य महिला आयोगाने शिफारस केल्यानंतर, POSH कायदा 2013 मध्ये सुधारणा करून 22 ऑगस्ट 2025 रोजी सुधारित जीआर प्रसिद्ध करण्यात आला. या जीआरमध्ये ICCs ला विशेष महत्त्व दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकारही दिले आहेत. सातारा प्रकरणात डॉक्टर आणि पोलीस यांच्यात परस्परविरोधी तक्रारी होत्या, ज्याची चौकशी समितीने शहानिशा केली होती. चौकशी समितीने डॉक्टरांना कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित बोलण्याचा सल्ला दिला होता आणि त्यांची बदली करण्याची शिफारस केली होती, अशी माहिती चाकणकरांनी दिली.

पुढे त्या म्हणाल्या, ज्या दिवशी घटना घडली तो लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. लक्ष्मीपूजनासाठी डॉक्टर प्रशांत बनकर यांच्या घरी होत्या. फोटो काढण्यावरून झालेल्या वादामुळे भांडण झाले आणि त्या घरातून निघून गेल्या. नंतर त्या एका लॉजवर राहायला गेल्या आणि रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केले, ज्याला प्रशांत बनकरने पूर्वीही धमक्या दिल्याचा उल्लेख करत प्रत्युत्तर दिले होते.

Published on: Oct 27, 2025 03:01 PM