सदाभाऊ खोत यांचा संजय राऊतांवर पटलवार, ‘डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते गटारगंगेत…’
sadabhau khot on sanjay raut : सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानतंर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका केली.
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. इतकंच नाहीतर सदाभाऊ खोत हा तर देवेंद्र फडणवीसांचा कुत्रा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जहरी टीका केली. यावर सदाभाऊ खोत यांनी पलटवार करत राऊतांवर निशाणा साधलाय. ‘कुत्रा इमाने धन्याची राखण करत असतं. ते खालेल्ला अ्न्नाला जागत असतं आणि आम्हीही तेच करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र तुम्ही २०१४ साली मोदींचा फोटो गळ्यात अडकून मताचा जोगावा तुम्ही मागत होतात. २०१९ लाही तेच केलं. पण सत्तेत आल्यानंतर पाठीत खंजीर खुपसलं. हे संपूर्ण राज्यानं पाहिलंय. त्यामुळे त्यांना सुर्याजी पिसाळ यांची उपमा दिली तर वागवी ठरणार नाही’, असं सदाभाऊ खोत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, संजय राऊत यांना काय वाटतं? त्यांचं मत मी फारसं गांभीर्याने घेत नाही. कारण डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते गटारगंगेत जातं. त्यामुळे आम्ही आमचे हात अस्वच्छ करायला डुक्कराला लावत नसतो, असही म्हणत खोतांनी राऊतांवर हल्लाबोल केलाय.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

