Video | सांगलीतील बैलगाडा शर्यतीला सदाभाऊ खोत यांचा पाठिंबा
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे आजोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. असे असले तरी नेते सदाभाऊ खोत यांनी बैलगाडा शर्यतीला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेटदेखील घेतली आहे.
मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे आजोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. असे असले तरी नेते सदाभाऊ खोत यांनी बैलगाडा शर्यतीला पाठिंबा दिला आहे. त्यासाठी खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांची भेटदेखील घेतली आहे. उद्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात बैलगाडा शर्यत होणार आहे. आज दिवसभर आमदार गोपीचंद पडळकर झरे इथल्या आपल्या फार्महाऊसवर थांबलेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बैलगाडा शर्य़त आयोजित करणारच असा पवित्रा पडळकर यांनी घेतला आहे.
Latest Videos
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश

