Shirdi | शिर्डीतील साई मंदिर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डीतील साईंचे मंदिर खुले होत असल्याने ग्रामस्थ आणि व्यवसायिकांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. मंदिर बंद असल्याने शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाले होते.

शिर्डी : साईबाबांचा श्रद्धेचा दरबार अनेक महिन्यांच्या सबुरीनंतर उद्या‌ सुरू होतोय. भाविकांच्या‌ स्वागतासाठी साईंची नगरी सज्ज ‌झाली असून साई संस्थाननेही जय्यत तयारी केली आहे. साई समाधी मंदिरासह चावडी, द्वारकामाई तसेच गुरूस्थान मंदिराला उत्सवाप्रमाणे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय तर प्रवेशद्वारावर झेंडूच्या‌ फुलांचे तोरण उभारण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. राज्य शासनाच्या आदेशानंतर सर्व धार्मिक स्थळे खुली होत असून भाविकांना कोरोना नियमावलीचे पालन करत दर्शन घ्यावे लागणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे शिर्डीतील साईंचे मंदिर खुले होत असल्याने ग्रामस्थ आणि व्यवसायिकांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. मंदिर बंद असल्याने शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाले होते. आता मंदिर सुरू होत असल्याने सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI