‘सबका मालिक एक’ म्हणणाऱ्या साईंच्याच धर्माचा वाद; मंदिरातून साईंची मूर्ती हटवण्याची मोहिम
काशीमध्ये पुन्हा एकदा साईबाबांच्या धर्माचा वाद उफाळून आला आहे. काही हिंदूत्ववादी संघटनांनी देवळात असणाऱ्या साईबाबांच्या मूर्त्या हटवण्याची मोहिम सुरू केली आहे. यामध्ये आतापर्यंत १४ मंदिरातील साई बाबांची मूर्ती हटवली गेल्याची माहिती मिळतेय.
उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा धार्मिक वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सनातन रक्षक दल नावाची संघटना मंदिरातील साई बाबांच्या मूर्त्या हटवण्याची काम करू लागलंय. आतापर्यंत १४ मंदिरातील साई बाबांची मूर्ती हटवली आहे. यानंतर काही साईबाबांच्या मूर्त्यांचं गंगेत विसर्जन करून टाकण्यात आलंय. तर सनातन रक्षक दल नावाची संघटनांनी आणखी शंभर मंदिराची यादी तयार केली असल्याची माहिती समोर येत आहे. साईबाबांची मूर्ती हटवण्यामागे सनातन रक्षक आणि केंद्रीय ब्राम्हण महासभाचं कारण म्हणजे सनातन मंदिरात सनातन देवता असावी, धर्मग्रंथानुसार कोणत्याही देवळात मृत मानवाची पूजा करणं निषिद्ध आहे. धर्मशास्त्रात कुठेही साईपूजा आढळत नाही. हिंदू धर्मात केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पाच मूर्तीच बसवता येतात. साईबाबांचं खर नाव चांद मियाँ असून ते मुस्लिम होते. याआधीही त्यांच्या मूर्तीच्या पूजेवर आक्षेप घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. अशी कारणं साईबाबांची मूर्ती हटवणारे सनातन रक्षक दल आणि केंद्रीय ब्राम्हण महासभेने दिली आहे. यावर राजकीय वर्तुळातील नेते मंडळी काय म्हणताय? बघा स्पेशल रिपोर्ट