AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam : माझ्या काकूचा मृतदेह घरात अन् तेव्हा हल्ला..., जखमी पर्यटकांना खांद्यावरून नेणारा काश्मिरी तरूण टिव्ही ९ मराठीवर

Pahalgam : माझ्या काकूचा मृतदेह घरात अन् तेव्हा हल्ला…, जखमी पर्यटकांना खांद्यावरून नेणारा काश्मिरी तरूण टिव्ही ९ मराठीवर

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: May 02, 2025 | 1:34 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर सज्जाद अहमद भट्ट हा स्थानिकांसोबत संकटात सापडलेल्या पर्यटकांना मदतीसाठी पोहोचला. सज्जादने जखमींना पाणी दिलं आणि घोड्यावर बसून मदत केली. त्याची चांगलीच चर्चा झाली.

गेल्या आठवडाभरापूर्वी पेहेलगाममध्ये धर्मविचारून पर्यटकांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ही एक बाजू असली तरी इथल्या स्थानिक काश्मिरी मुसलमानांनी जीवाची बाजी लावून त्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय पर्यटकांना सुखरूप ठेवलेलं होतं. पेहेलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना मदत करणाऱ्या अनेकांची नावं समोर आली. त्यापैकी सज्जाद अहमद भट्टचं नाव देखील चर्चेत होतं. इतकंच नाहीतर सज्जाद अहमदचे पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना खांद्यावरून सुखरूप स्थळी नेतानाचे व्हिडीओही चांगलेच व्हायरल झाले होते. याच सज्जाद अहमद नावाचा काश्मिरी तरूणासोबत टिव्ही ९ मराठीने संवाद साधला आहे. त्या हल्ल्याच्या वेळी नेमकं काय घडलं? कशी परिस्थिती होती? यावर सज्जाद अहमदने सारं काही सांगितलं. बघा व्हिडीओ

Published on: May 02, 2025 01:32 PM
Follow Us